हिंगोली: भाजप कार्यालय येथे भाजप ओबीसी कार्यकारिणी बैठक व निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न
हिंगोली येथे आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दोन वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक पार पडली यामध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे तसेच भाजपाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजानन घुगे यांची विशेष उपस्थिती होती.