नांदेड: ऑनलाईन पद्धतीचा वापर करून वृद्धाची एपिके फाईल पाठवून फोन हॅक करून फसवणूक केल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा नोंद
Nanded, Nanded | Oct 31, 2025 दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान फिर्यादी बालाजी उत्तरवार यांना व्हेरीकोज व्हेन कंपनीचे औषध परत करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीच्या मोबाईल फोनवर currier. Apk फाईल पाठवून फोन हॅक करून बँक ऑफ इंडिया खात्यातून एक लाख 40 हजार रुपये काढून घेऊन ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केली होती, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि तुरनर हे करत आहेत.