हिंगोली: सातबारामध्ये पुरुषासोबतच महिलांच्या नावाची नोंद घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली सातबारा व आठ अ मध्ये पुरुषासोबतच महिलांच्या नावाची नोंद घेण्यासाठी महिला व बालविकास तसेच बचतगटामार्फत विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिले. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पार पडली यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.