रामटेक: करवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात 54 वर्षीय गुराखी जखमी
Ramtek, Nagpur | Mar 18, 2026 मानव व हिस्त्र प्राणी संघर्ष थांबविण्यासाठी मागील सात दिवसांपासून अप्पर तहसीलदार कार्यालय देवालापार समोर ग्रामवासियासह देवलापार परिक्षेत्र जनसंरक्षण समितीद्वारे जन आंदोलन सुरू असतानाच मंगळवार दिनांक 17 मार्चला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रा अंतर्गत करवाही येथे बालकिशन वसंता बोपटे, वय 54 वर्ष रा. खंडासा या गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे.