बोरिवली मधील गोराई जेट्टीजवळ नवरात्रीसाठी
उभारलेला शिवसेनेचा गेट जोरदार वाऱ्यामुळे व
पावसामुळे कोसळला
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे गोराई जेट्टीजवळ नवरात्रीसाठी उभारलेला शिवसेनेचा गेट जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आज रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत एका लाईट पोलचे आणि कोळी समाजाच्या पुतळ्याचे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही