जालना: गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 कायम ठेवण्याची मागणी; कलम 11 मधील संशोधन आणि 2026 चा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी
Jalna, Jalna | Jun 30, 2026 सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड अधिनियम 1956 कायम ठेवण्यात यावा तसेच कलम 11 मधील करण्यात आलेले संशोधन आणि नवीन सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड 2026 लागू करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सिकलीकर-सिख सामाजिक कार्यकर्ते संतोष सिंग कलाणी यांनी सोमवार दि. 29 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली. महाराष्ट्र शासनाने विद्यमान सचखंड गुरुद्वारा बोर्ड,नांदेड अधिनियम 1956 रद्द करून त्याऐवजी नवीन अधिनियम लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.