अकोला: फतेह चौकात मोठा अपघात टळला : कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण
Akola, Akola | Oct 20, 2025 अकोला फतेह चौक परिसरात एसीसी क्लब फटाका बाजाराजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. दीपावलीमुळे परिसरात प्रचंड गर्दी आणि फटाक्यांच्या दुकानांची रेलचेल असल्याने क्षणभरात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली.