उत्तर सोलापूर: राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क मंत्रीपदी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड…
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी नुकतेच एक पत्र काढले असून त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर, धाराशिव, जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.