धामणगाव रेल्वे: कॉटन मार्केट चौक येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची तहसीलदार यांच्या कार्यालयात राऊटी आंदोलन
धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी व केवायसी दुरुस्तीचे प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवार, दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालयाकडून संबंधित दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याचा आरोप करीत क्रांतिकारी शेतकरी संघटना यांनी कठोर भूमिका घेत बुधवार, ला तहसीलदार, धामणगाव रेल्वे यांच्या केबिनमध्ये राहुटी आंदोलन केले.या आंदोलनात हजारो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.