गोंदिया जिल्ह्यात तब्बल ९०% शेतकरी धान शेतीवर अवलंबून आहेत.अनियमित पाऊस,वाढता उत्पादन खर्च, खत-बियाण्यांचे वाढलेले दर आणि मजुरीचे दर,या सगळ्या अडचणींवर मात करून आपल्या शेतकऱ्यांनी धानाचे उत्पादन कष्टाने उभे केले आहे.यातील बहुतेक शेतकरी आपले धान किमान आधारभूत किमतीवर शासन खरेदी केंद्रावर विक्री करतात.अशा परिस्थितीत धानोत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल बोनस मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून मागणी आमदार विनोद अग्रवाल आमदार विजय रंहागडाले यांनी केली.