नागपूर ग्रामीण: नागपुरात ८ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी, 14 महिन्यात झाली सुनावणी
८ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५६ वर्षीय नराधमाला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. गणपत नानाजी जयपूरकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे १५ सप्टेंबर २०२४ रोजी पारडी परिसरात ही घटना घडली होती. पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता.