हवेली: लोणी काळभोर येथील पोलिस पाटलांना ऊसतोड करणाऱ्या भावांनी घातला 5 लाख 22 हजारांचा गंडा
Haveli, Pune | Oct 1, 2025 गुऱ्हाळाच्या व्यवसायासाठी 40 ते 50 ऊसतोड मजूर आणून देण्याचे आमिष दाखवून दोन चुलत भावांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलिस पाटलांची 5 लाख 22 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे.ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रानमळा परिसरात 2024 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.