नागपूर शहर: रक्षकच निघाले भक्षक अपघाताच्या कागदपत्रांसाठी लाच मागणारे हुडकेश्वर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक,हवालदार एसीबीच्या जाळ्यात
हुडकेश्वर पोलिस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक आकाश साकोरे आणि महिला पोलीस हवालदार शारदा भेरे यांना 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपींविरुद्ध हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. एका वकिलाने त्यांच्या पक्षकाराच्या वडिलांच्या अपघातासंबंधी कागदपत्रे मिळवण्यासाठी अर्ज केला होता.