ठेवीदारांची ५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या लासूर स्टेशन येथील श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे व उपाध्यक्षा सुशीला राजेंद्र मस्के यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.