पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, जिल्ह्यात मोठे उद्योग कमी प्रमाणात आहेत. परंतु सिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट लवकरच सुरू होणार आहे. हिंगणी भागात फार्मास्युटिकल कंपनी, टाटांच्या माध्यमातून कौशल्यवर्धन केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र याभागात सुरू होणार असून त्यातून कुशल मनुष्यबळ तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.