भोकरदन: पोस्ट ऑफिस परिसर महात्मा फुले चौकात विविध विकास कामांचा उपनगराध्यक्ष शफिक पठाण यांच्या हस्ते शुभारंभ
आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौक पोस्ट ऑफिस परिसरामध्ये भोकरदन नगर परिषद कार्यालयाच्या वतीने विविध विकास कामांचा शुभारंभ उपनगराध्यक्ष शफिक पठाण यांच्या हस्ते करण्यात आला आहे यामध्ये बंदिस्त नाली, सीसी सिमेंट रोड यासारख्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला असून याप्रसंगी स्थानिक नगरसेवक, स्थानिक नागरिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.