आगामी पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे.वेगवेगळे पक्षातील प्रमुख पदाधिकारी सोयीनुसार पसंतीच्या पक्षात पक्ष प्रवेश करीत आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पिंपळनेर येथे आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे मार्गदर्शन करताना म्हणाले की,पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीनुसार निवडणूक लढविण्