अमरावती: अमरावती महानगरपालिकेतर्फे आयोजित दिवाळी आनंदोत्सव 2025 मध्ये सेक्सोफोन आणि बासरीच्या सुरांनी अमरावतीकर मंत्रमुग्ध
दिवाळी आनंदोत्सवाच्या निमित्ताने अमरावती महानगरपालिका तर्फे दिनांक १६ ते २१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सांस्कृतिक भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार जानुदा डहाळे यांनी आपल्या आपल्या सुरेल सेक्सोफोन आणि बासरीच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. संगीत क्षेत्रातील एक खास “सोलो संगीत सादरीकरण” हे अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरले.