भोकरदन: रफिक कॉलनी परिसरामध्ये भोकरदन नगरपरिषद कार्यालयाकडून अनधिकृत बांधकामात चालवण्यात आला जेसीबी
आज दिनांक 6 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील रफीक कॉलनी परिसरामध्ये नगरपरिषद कार्यालय भोकरदन यांनी अनधिकृत बांधकामावर जेसीबी फिरवल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यामध्ये मुख्य रस्त्यावर काही नागरिकांनी बांधकाम केले होते त्यात जिने,पायऱ्या,ओटे यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता,आणि याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषद कार्यालयाने हाच या अतिक्रमण हटवले असल्याचे पाहायला मिळाले आहे.