साक्री: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपळनेर येथे आढावा बैठक संपन्न
Sakri, Dhule | Oct 26, 2025 साक्री काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगर परिषद या निवडणुका निमित्ताने कै.हरिभाऊ चौरे आदिवासी आश्रम शाळा पिंपळनेर येथे जिल्ह्याचे प्रभारी मा.श्री. राजाराम पानगव्हाणे तसेच साक्री तालुका प्रभारी मा.श्री.भारत टाकेकर, माजी खासदार चौरे,जिल्हाध्यक्ष प्रविण बापू चौरे,तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी उपस्थितामध्ये ज्येष्ठ व किसान सेल प्रदेश उपाध्यक्ष मा. उत्तमराव देसले, तालुका काँग्रेस चे पदाधिकारी दीपक साळुंखे,