साक्री: पिंपळनेरमध्ये प्रा.हंकारे यांचे भव्य-दिव्य व्याख्यान संपन्न; हजारो प्रेक्षकांची उपस्थिती;अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला
Sakri, Dhule | Oct 17, 2025 "जिवंत पणेच आई-वडिलांना मृत्यूचे दरवाजे दाखवणारी भरकटलेली तरुणाई" या विषयावर पिंपळनेर येथे प्रा. वसंत हंकारे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे भव्य आयोजन करण्यात आले.त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख करणारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राराम पवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री बिंदू शेठ शर्मा,मा. श्री महंत सर्वेश्वरदास महाराज, मोहम्मदी भाई पिंपळनेरवाला हे उपस्थित होते. प्रस्ताविक अॅड. रूपाली चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश वाघ यांनी केले.