धामणगाव रेल्वे: जळगाव मंगरूळ येथील विद्यार्थी व पालकांचे शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण
अमरावतीतील जिल्ह्यातील जळगाव मंगरूळ या गावातील एक गरीब कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून समाजकल्याण कार्यालया जवळ उपोषणाला बसले आहे . राजेंद्र बानवगडे यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी समाजकल्याण आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. त्यांची मुलगी दीपिका बावनगडे ही 2024 मध्ये पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरली होती. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे प्रवेश व शिक्षण शुल्क भरण्यात अडचणी आल्या. करिता तिने रुलर इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन अग्रिकल्चर अमरावती येथे प्रवेश घेतला आहे.