जळगाव: पिंप्राळा रोड परिसरात वृध्दाच्या ६० हजाराच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील पिंप्राळा रोड परिसरात राहणाऱ्या एका वृध्दाच्या ६० हजार रूपये किंमतीच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.