ब्लड प्रेशर कमी झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले जाणारे एक इंजेक्शन खेळाडूंनी चुकीच्या पद्धतीने वापरल्यास ते जीवघेणे ठरू शकते. अशा इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस शिपाई अमर राणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.