उत्तर सोलापूर: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरं आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, “सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. येथे सर्वाधिक भरपाई मिळणार असून प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत द्यावी,” अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.