नाशिक: भविष्यत कलावंतांचे चांगले दिवस येणार : जेष्ट अभिनेते दामले
मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुरस्कार वितारन
Nashik, Nashik | Nov 5, 2025 भविष्यात कलावंताना चांगले दिवस येणार असल्याचे प्रतिपादन जेष्ट अभिनेते प्रशांत दामले यांनी केले.कलावंतांच्या कले साठी आणि कलावंतांसाठी संस्था अविरत काम करत राहील असे देखील त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. बुधवार दि. ०५ रोजी कालिदास कला मंदिर येथे महानगर पालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कारेक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर ह्या होत्या.