वाल्मीक कराडचे बॅनर मी नसून जाणून-बुजून कोणीतरी व्हायरल केलाय, कराड समर्थक तांदळे यांचा शा.विश्रामगृह येथे खुलासा
बॅनरद्वारे वर्गणी मागितल्याच्या आरोपावर संदीप तांदळेनं स्पष्टीकरण दिलंय. त्यात जाणूनबुजून कुणीतरी बनावट बॅनर व्हायरल केलंय. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा कुणाचातरी डाव असल्याचं संदीप तांदळेनं म्हटलंय. संदीप तांदळे आपल्या स्पष्टीकरणात म्हणाला की, बाळा बांगर यांचं नाव मी घेतो. कारण ते मला गुंड प्रवृत्तीचा म्हणाले आहेत. आम्ही वाल्मिक अण्णांचं समर्थन करतो, असं ते म्हणाले. मात्र हे समर्थन आम्ही उघडपणे करतो, त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही.