दिग्रस: दिग्रसच्या अनेक राजकीय दिग्गजांची शिवसेनेत घरवापसी; मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत दिग्रसच्या राजकारणाला नवी कलाटणी
दिग्रस शहराचे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान, इफतेकार खान आणि डॉ. संजय बंग या राजकिय दिग्गजांनी आज दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान शिवसेनेत पुनरागमन केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तिघांनी पक्षप्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे नेते पराग पीगळे, यशवंत पवार, बाळासाहेब दौलतकर तसेच दिग्रस तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या राजकीय दिग्गजांच्या घरवापसीमुळे दिग्रस नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता झाली.