अलिबाग: अलिबाग समुद्रात दोन तरुण बेपत्ता; मित्रांसमोर घडली दुर्घटना, पोलिसांचा शोध सुरू
Alibag, Raigad | Nov 1, 2025 अलिबाग येथील समुद्रात बुडून दोन पर्यटक तरुण बेपत्ता झाल्याची घटना आज संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ड्रोन आणि बॅटरीच्या सहाय्याने पोलिस आणि जीवरक्षक या दोघांचा शोध घेत आहेत. शशांक सिंग (१९) रा. उलवे ता. उरण आणि पलाश पखर (१९) रा. सानपाडा नवीमुंबई अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत. ते आपले नातेवाईक आणि मित्रांसह अलिबागला फिरायला आले होते. संध्याकाळच्या सुमारास यातील एकजण पोहायला उतरला. तो बुडू लागल्याने दुसरा त्याला वाचवायला गेला. मात्र दोघेही बुडून बेपत्ता झाल