रायगड जिल्ह्यात मागील वर्षात सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 421 सर्पदंशग्रस्त रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यापैकी बहुतांश रुग्णांवर वेळेवर आणि प्रभावी उपचार करण्यात आल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले असून ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.