औंढा नागनाथ: जवळा बाजार जवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीस धडक;तलाठी जखमी चालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारात गस्तीवर असलेल्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकातील तलाठ्याच्या दुचाकीस अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने तलाठी मल्लिकार्जुन कापसे गंभीर जखमीस झाले. याप्रकरणी मंडळ अधिकारी सुजाता गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरचालक ज्याचे नाव गाव माहित नाही यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक 3 ऑक्टोबर सोमवार रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे