वर्धा रोडवर असलेल्या 'दाबो' पबमध्ये ख्रिसमस पार्टी दरम्यान झालेल्या शुल्लक वादाचे रूपांतर एका भीषण हत्याकांडात झाले आहे. एका तरुणीचा मोबाईल नंबर मागण्यावरून झालेल्या वादातून काही तरुणांनी मिळून एका युवकाची सळई आणि विटांनी ठेचून हत्या केली, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. प्रकरणात एकूण आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.