किनवट: बोधडी येथे दोन समाजात तेढ निर्माण करत सार्वत्रिक उपद्रव पसरल्याप्रकरणी किनवट पोलिसात गुन्हा नोंद
Kinwat, Nanded | Nov 1, 2025 दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास बोधडी येथे आरोपी शेख सोहेल रा. एकता नगर गोकुंदा याने इस्टाग्राम आयडी mr. Sohel king 420 ह्या अकॉउंटवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट केले होते, ह्या प्रकरणी रविकांत कंतुलवार व्य. खाजगी नोकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनवट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि फडेवार हे करत आहेत.