राजूरा: राजुरा येथील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश
जनतेच्या न्याय , हक्कासाठी लोकाभिमुख कार्य आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच सरकारच्या विकासात्मक योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. राजुरा येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज दि 6 नोव्हेंबर ला 12 वाजता भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.