ठाणे: भास्कर कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा गेला चोरीला, मनसेचा आरोप
Thane, Thane | Sep 24, 2025 नौपाडा भास्कर कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा चोरीला गेला असल्याचा आरोप मनसेच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास केला आहे. सदर ठिकाणी इमारत बनवण्याचे काम सुरू असून विकासकाने हा ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडला असल्याचं सांगण्यात येत आहे. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी निषेध नोंदवला आहे.