जालना: धारकल्याण पाटीवरील भीषण अपघात; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर; चालक मद्यधुंद असल्याचा आरोप
Jalna, Jalna | Jul 4, 2026 जालना तालुक्यातील धारकल्याण पाटीजवळील रंगनाथ महाराज मठासमोर शुक्रवारी (दि. 3 जुलै) रात्री सुमारे 8 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात नंदापूर येथील एका 22 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शनिवार दि. 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमुळे नंदापूर गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून संबंधित चालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.