21 डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कळमना हद्दीतील डिप्टी सिग्नल येथून विक्रीसाठी नायलॉन मांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून दहा मांजाची चक्री किंमत 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आरोपीचे नाव राहुल सोनबाइर असे सांगण्यात आले आहे.