नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज) या विद्यार्थीनीचा हॉटेलमध्ये चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवकर कॉलेजमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.