जालना: सिरसवाडी येथे झोपलेल्या तरुणावर चाकू हल्ला करुन खून; काही तासांत आरोपी जेरबंद; पोलीस कर्मचारी मदन गायकवाड यांची कारवाई
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालना तालुक्यातील सिरसवाडी गावात शेत वस्तीवर घरासमोर झोपलेल्या तरुणावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात निखिल वाघमारे या तरुणाचा मृत्यु झाला आहे. शनिवार दि. 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्याला गंभीर जखमी असताना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.निखिल वाघमारे हा त्यांच्या शेतातील वस्तीवर घरासमोर झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने खून केला होता.