कोरेगाव: फटाक्यांच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार; चौघांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी सातारारोड रस्त्यावर आले धुण्याच्या एका कंपनीसमोर फटाक्यांच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी कोयता कोयत्याने वार करत लोखंडी गजाने दोन जणांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.