बदलापूर वालिवली डम्पिंग ग्राउंड बंद करा अशी मागणी सातत्याने होत आहे. अशातच आज दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ग्रामस्थांनी आज डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आंदोलन केलं आहे हे आंदोलन नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.