बुलढाणा: शहरात व तालुक्यात अवैध दारू विरोधात पोलिसांची मोठी मोहीम, 12 गुन्हे दाखल
बुलढाणा शहर आणि तालुक्यात वाढत्या अवैध दारू विक्री व जुगार प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी ११ आक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहर व ग्रामीण भागात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १२ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि जुगार साहित्य जप्त केले आहे. शहर पोलिसांनी दहा ठिकाणी तर ग्रामीण पोलिसांनी दोन गावांमध्ये छापे मारून कारवाई केली आहे.