गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना कर्जतचे तहसीलदार रवी सतवन आणि त्यांच्या पथकावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सदरची कारवाई करताना वाहन आडवे घालून अडथळा निर्माण करणाऱ्यांना कर्जत पोलिसांनी गुरुवारी (ता.१८) रात्री वाहनांसह ताब्यात घेतले. अजय अशोक गोरे आणि आकाश अशोक गोरे (दोन्ही रा. मिरजगाव ता.कर्जत) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी दिली.