राजूरा: विरुर स्टेशन येथे बापुनगर आदिवासी कोलाम गुड्यावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव उपक्रम
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने आदिवासी कोलाम गुड्यांवर दीपोत्सव हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. विरुर स्टेशन परिसरातील बापुनगर आदिवासी कोलाम गुड्यावर हा दिपोत्सव उपक्रम आज दि 21 ऑक्टोबर ला 12 वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव टप्पे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आदींसह उपस्थित होते.