जालना: रेल्वे स्थानक ते मंमादेवी मंदिरापर्यंत पारंपरिक मिरवणूक; शंभर वर्षांची परंपरा आजही कायम
Jalna, Jalna | Apr 4, 2026 जालना शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग ठरलेला मंमादेवीचा ‘बारा गाड्या’ उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला मंमादेवीचा बारा गाड्या रेल्वे स्थानक मधुबन कॉलनी डबल जिम आदी भागाला लागून मार्गे मस्तगड पर्यंत संपन्न झाली आहे . मंमादेवीचा दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे स्थानक ते मंमादेवी मंदिरापर्यंत बारा गाड्यांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. नवस पूर्ण झाल्यानंतर बारा गाड्या ओढण्याची ही परंपरा तब्बल शंभर वर्षांपासून सुरू असून आजही ती तितक्याच श्रद