जालना: सत्ताधाऱ्यांकडून कुठलेच काम होणार नाही हे आता स्पष्ट झाले – शिवसेना विरोधी पक्षनेते कमलेश खरे
Jalna, Jalna | May 10, 2026 जालना महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून शहरातील राजकारण पुन्हा तापले असून सत्ताधारी भाजपवर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. शहरातील विविध मागण्यांसाठी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच नगरसेवक भास्कर दानवे आणि नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये सावरकर जलतरण तलाव परिसरातील अस्वच्छता, शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, अतिक्रमणाचे प्रश्न तसेच इतर नागरी समस्यांचा उल्लेख करण्यात