खामगाव: एमएसईबी ऑफीस जवळ पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या अंगठ्या लंपास
पोलिस असल्याचे सांगून हातातील दोन अंगठ्या चलाखीने लंपास केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान एमएसईबी ऑफीस जवळ घडली. वासुदेव ओंकारराव गोधे (६७) रा. तेल्हारा हे मोठ्या देवीच्या दर्शनाकरीता जात असताना एमएसईबी ऑफीस जवळ दोन अनोळखी इसम भेटले व म्हटले की आम्ही पोलिस आहे हातातील अंगठ्या काढून घेवून कागदात गुंडाळून चलाखी करुन गोधे यांना पितळी अंगठी कागदात गुंडाळून देवून दोघे मोटरसायकलने पळून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोदे यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.