मुंबई: काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न
Mumbai, Mumbai City | Feb 13, 2024
अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली.पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भाजपा पक्षात गेले.अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे मंगळवार,(ता.१३) फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली