जालना: दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई; 1 लाखांहून अधिक मुद्देमालासह दोघांवर गुन्हा
Jalna, Jalna | Jun 6, 2026 जालना जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात दहशतवाद विरोधी शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 2 किलो 240 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शनिवार दि. 6 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 1 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या आदेशानुसार अवैध गांजा विक्री करणार्यांविरुद्ध मोहीम राबविली.