मोहाडी: पंचायत समिती मोहाडी येथे सरपंच संघटना व आमदार राजू कारेमोरे यांच्यात विविध विषयांवर चर्चा
पंचायत समिती मोहाडी येथे आमदार राजू कारेमोरे आणि गट विकास अधिकारी सिंगनजुडे यांच्या उपस्थितीत सरपंच संघटनेने दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. दरम्यान गावातील विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी, पंचायत समितीचे सभापती जगदीश शेंडे, उपसभापती देवा चकोले, माजी सभापती रितेश वासनिक, तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र नागफासे आणि माजी उपसरपंच परमेश्वर नलगोपुलवार उपस्थित होते. सरपंचांनी निधी मिळण्यास होणारा विलंब आणि प्रशासकीय अडचणींसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.